Friday, March 29, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्पुटर शाखेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.पाच दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये या शाखेतील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना “जावा प्रोग्रामिंग” या विषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
8 मार्च ते 12 मार्च या दरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कॅप जेमिनी, पुणे या कंपनीचे कार्पोरेट ट्रेनर संजय देगावकर हे प्रमुख मार्गदर्शक होते. कार्यशाळेच्या उद्घाटनादरम्यान समन्वयक प्रा. पांडुरंग मगदूम यांनी मान्यवरांची ओळख करून दिली व कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, संजय देगावकर, तसेच बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
डॉ. महेश भागवत यांनी ही कार्यशाळा प्रशिक्षण व प्रयोगाधारित असल्याने सध्याच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला पूरक असून त्याचा विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर काळात निश्चित फायदा होईल असे सांगितले.
यानंतर ट्रेनर संजय देगावकर यांनी प्रथम जावा विषयी मुलभूत माहिती देऊन जावा सरोलेट, स्टब, स्विंग यासारख्या जावा संबंधित विविध सॉफ्टवेअंर बद्दल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जावा मधील समकालीन प्रगतीचा आढावा घेऊन त्यातील बहुतांश सॉफ्टवेअंर मध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तसेच अंतिम सत्र काळात याअंतर्गत उपलब्ध असणारे रोजगार, त्यासाठी आवश्यक कौशल्ये विकास आणि त्याची रोजगाराभिमुख उपयुक्तता स्पष्ट केली. सहभागी झालेल्या अंतिम विद्यार्थी विद्यार्थिनीनि समारोपप्रसंगी कार्याशाळेदरम्यान मिळालेले प्रशिक्षण व अनुभव उपयुक्त होते असे सांगितले.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.
फोटो:
1. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय देगावकर

No comments:

Post a Comment