Friday, March 29, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्पुटर शाखेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
तीन दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना “मशीन लर्निंग” या विषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.आजच्या काळात कॉम्पुटर शाखेमध्ये पायथॉन प्रोग्रामिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे या शाखेतून पदवी घेणा-या अंतिम वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनीना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण कालावधीमध्येच याची माहिती व ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उद्घाटनादरम्यान विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सध्याचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम व यामधील रोजगारासाठी आवश्यक असणारी कौशल्ये यांचा समन्वय साधण्यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले.इंटीलेक्ट टेक्नोलॉजी, मुंबई चे डायरेक्टर राहुल गुप्ता व त्यांचे सहकारी तेजस कसारे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंग व त्याचा मशीन लर्निंग साठीचा वापर, याबद्दल प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.तसेच याअंतर्गत येणा-या विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंटची माहिती दिली. सहभागी झालेल्या अंतिम विद्यार्थी विद्यार्थिनीनि समारोपप्रसंगी कार्याशाळेदरम्यान मिळालेले प्रशिक्षण व अनुभव उपयुक्त होते असे सांगितले.या कार्यशाळेचे नियोजन समन्वयक प्रा. मानसी गोरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच व्यवस्थापनाचे यासाठी मार्गदर्शन व पाठबळ लाभले.
फोटो:
१. राहुल गुप्ता यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच शेजारी तेजस कसारे, मुश्ताक गडकरी, मानसी गोरे इ.
२. कार्याशाळेदरम्यान सह्भागी विद्यार्थी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना राहुल गुप्ता.


No comments:

Post a Comment