Friday, March 29, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन संशोधन प्रकल्पांची निवड !!

आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन संशोधन प्रकल्पांची मुंबई विद्यापीठ अनुदान

मंडळातर्फे संशोधन अनुदानांतर्गत निवड झाली आहे. यामध्ये कॉम्पुटर विभागातून प्रा. मुश्ताक गडकरी व मेकॅनिकल विभागातून प्रा. मंगेश प्रभावळकर यांच्या प्रकल्पांना मुंबई विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची अनुदानासाठी निवड करण्यात येते. स्वच्छ पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन तसेच पूरनियंत्रण यासाठी प्रामुख्याने स्थानिक सरकारी यंत्रणा काम करीत असतात. तसेच सध्या शहरांमध्ये आगी लागण्याचेही प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वांचा आहे त्या मनुष्यबळाचा वापर करून निपटारा करताना यंत्रणेवरील त्राण वाढत आहे. त्यामुळे यासाठी काहीतरी उपाय सुचविण्याच्या विचारातून प्रा. गडकरी यांनी संशोधन प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते “इंटरनेट ऑफ थिंग्स” आधारित प्रणाली विकसित करणार असून त्यासाठी त्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. संशोधनांती ते स्थानिक यंत्रणाना उपाय सुचवणार आहेत.
महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातून निवड झालेले प्रा मंगेश प्रभावळकर सौरउर्जेवर आधारित जलशुद्धीकरण निर्मिती प्रकल्प
प्रतिकृती तयार करणार आहेत. त्यांनी हाती घेतलेली पूर्ण यंत्रणा ही सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक उर्जास्त्रोतावर आधारित असून त्यामध्ये विशिष्ट उपकरणांद्वारे पाण्याचे शुद्धीकरण, व त्याची योग्यप्रकारे साठवणूक यावर ते काम करणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी संशोधक प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले कि, मागील काही वर्षात महाविद्यालयाचे जवळपास तेरा प्रकल्प अनुदानास पात्र ठरले असून यावर्षीही ही परंपरा या प्राध्यापकांनी कायम राखली आहे. ते पुढेम्हणाले कि, जलशुध्धीकरण, शेती, गृहोपयोगी साधने, वाहन उद्योग यासारख्या सर्वसामान्यांशी निगडीत विषयावरती संशोधन करून अभियांत्रिकीचा उपयोग सर्वसामान्यांना करून देण्यामध्ये या प्राध्यापकांचे संशोधनांती मोठे योगदान होईल. संस्थाध्यक्ष मा.रवींद्र माने यांनीही महाविदयालय संशोधन कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले असून यापुढील काळामध्येसुध्धा प्राध्यापकांना
संशोधन सुविधा निर्माण करून देण्यात येतील असे सांगितले.
प्राध्यापकांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या
विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
फोटो:
1. प्रा. मुश्ताक गडकरी
2. प्रा. मंगेश प्रभावळकर


No comments:

Post a Comment