Tuesday, March 5, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
नुकताच जनसागर हॉल, पुणे येथे संपन्न झाला. या संमेलनात महाविद्यालयाचे व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य तसेच विभागप्रमुखांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही बहुसंख्येने सहभाग नोंदवून आपला महाविद्यालयाप्रती स्नेहभाव व्यक्त केला.संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, सचिव दिलीप जाधव,विश्वस्त जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी मान्यवराच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुख, माजी विद्यार्थी संघ समन्वयक, प्लेसमेन्ट अधिकारी, ऑफिस अधीक्षक पद्मनाभ शेलार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संदीप कौल यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रथम माजी विद्यार्थी संघ समन्वयक प्रा. इसाक शिकलगार यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाची उद्दिष्ट्ये व भूमिका स्पष्ट केली तसेच  हाविद्यालयाचे प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. पराग जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून रोजगाराच्या उपलब्ध संधी, त्यासाठी महाविद्यालयामार्फत राबवण्यात येणारे उपक्रम आणि नोकरी मार्गदर्शनाविषयी माहिती दिली.
त्यांनी विविध माध्यमातून महाविद्यालयशि बांधिलकी राखलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
यानंतर महाविद्यालयाच्या सर्व विभागांच्या प्रमुखांनी आपल्या विभांतर्गत घडामोडी, उपक्रम, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची गौरवांकित कामगिरीची माहिती दिली. १७ जुलै २०१९ ला इंग्लंड येथे होणा-या जगातील सर्वात प्रतिष्ठीत अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या टीम एम एच ०८ रेसिंग च्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या फॉर्मुला स्टूडंट रेस कारचे सादरीकरण केले. यानंतर प्राचार्य डॉ. भागवत यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी
विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांनी कायम महाविद्यालयाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले. यानंतर माजी विद्यार्थी संदीप कौल, राहुल बोधे, रोहिणी बंदागले, शेफाली घाणेकर, सोमनाथ पाटील, सुमित पाटील, यांनी आपले प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना आपल्या यशामध्ये महाविद्यालयाचा फार मोठा वाट असल्याचे सांगून कृतज्ञता
व्यक्त केली.
स्नेह्भोजानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली व सर्व माजी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रा. स्नेहल मांगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:
1. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी रोहिणी बांडागळे आपले मनोगत व्यक्त करताना प्रसंगी व्यासपीठावर मा. रवींद्र माने,
कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, सचिव दिलीप जाधव, विश्वस्त जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश
भागवत आदी
2. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ समन्वयक प्रा. इसाक शिकलगार प्रास्ताविकात माजी विद्यार्थी संघाची उद्दिष्ट्ये व
भूमिका स्पष्ट करताना प्रसंगी व्यासपीठावर मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे,
सचिव दिलीप जाधव, विश्वस्त जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी


No comments:

Post a Comment