Monday, April 2, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागातर्फे ‘थ्रीडी प्रिंटींग’ कार्यशाळा संपन्न!!!!



फोटो: ‘थ्रीडी प्रिंटींग’ कार्यशाळा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व युनायटेड किंग्डम येथील नॅशनल सेंटर फॉर अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींगचे सिनिअर रिसर्च इंजिनीअर उत्कर्ष अंकलखोपे व उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक
   आंबव(देवरुख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल(यांत्रिकी) विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘थ्रीडी प्रिंटींग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे मार्गदर्शक व युनायटेड किंग्डम येथील नॅशनल सेंटर फॉर अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींगचे सिनिअर रिसर्च इंजिनीअर उत्कर्ष अंकलखोपे यांनी दिवसभराच्या दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यामध्ये द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
   सुरुवातीला प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. अंकलखोपे यांचे स्वागत केले व ओळख करून दिली.श्री. अंकलखोपे हे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून  ऑटोमोबाईल विभागातून २००७ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर आपले पदव्युत्तर शिक्षण रॅपिड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विषयातून युके येथून पूर्ण केले.कार्यशाळेदरम्यान त्यांनी पहिल्या सत्रामध्ये मॅन्युफॅक्चरींगच्या विविध पद्धती,त्यातील तंत्रज्ञान,उपयोगात येण्यासारखी मटेरियल यांची माहिती दिली.त्यानंतरच्या सत्रामध्ये अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग केव्हा वापरले जाते,ते कोणते उत्पादन करण्यासाठी उपयुक्त ठरते,मेडिकल,फॅशन,ऑटोमोबाईल यासारख्या विविध उद्योगांमध्ये त्याचा वापर कसा केला जातो यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच ३D प्रिंटींग,त्याचे वापरातील विविध प्रकार यांसारख्या अद्ययावत मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
  कार्यशाळेअंती उत्कर्ष अंकलखोपे यांनी विद्यार्थ्यांना आपले जन्मस्थान,घरची परिस्थिती याचा जास्त विचार न करता मेहनत,ज्ञान व सातत्यपूर्ण प्रयत्न यांवरच आपली पुढील प्रगती अवलंबून असते असा मोलाचा सल्ला दिला.त्यांनी महाविद्यालयाची प्रगती,उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे सांगितले.प्राचार्यांनी कार्यशाळेचा विषय हा सध्याच्या संशोधनाचा विषय असून तो विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यासावा असे सांगितले.
  प्रमुख मार्गदर्शक व मान्यवरांचे आभार मानताना विभागप्रमुख डॉ.सचिन वाघमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या अंतिम वर्षातील प्रोजेक्टसाठी सदर ज्ञानाचा उपयोग करावा तसेच भावी कारकिर्दीसाठी सदर ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले.कार्यशाळा नियोजनामध्ये प्रा.मंगेश प्रभावळकर,प्रा.गणेश जागुष्टे,प्रा.वैभव डोंगरे यांचे सहकार्य लाभले.







No comments:

Post a Comment