Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “ऑटो सर्व्हिस सेंटरचे” संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी मानेंच्या शुभहस्ते उद्घाटन‼फोटो:- उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष रविंद्रजी माने,कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये,उपस्थित मान्यवर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग
   देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय संचलित तंत्रज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून अद्ययावत “ऑटो सर्व्हिस सेंटरचे” उद्घाटन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते तसेच कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्रद्युम्न माने तसेच देवरुख शहरातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीत पार पडले.   
  अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॉम्प्यूटराईज्ड व्हील अलाइन्मेंट, व्हील बॅलन्सिंग तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. देवरुख आणि परिसरातील वाहनधारकांसाठी हि एक अतिशय चांगली सुविधा महाविद्यालयातर्फे मैत्री पेट्रोल पंप येथे सुरु झाली आहे व याचा लाभ देवरुख व आसपासच्या परिसरातील वाहनधारकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी केले आहे.
  या ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक उपकरणांवर प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध असणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयातील अद्ययावत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता ते समाजाभिमुख व्हावे या संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने यांच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
  उद्घाटनानिमित्त व्हील अलाइन्मेंट, व्हील बॅलन्सिंग वरती विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.ही सवलत पुढील काही दिवसांसाठी उपलब्ध राहणार आहे.अधिक माहिती ऑटो सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध होईल.No comments:

Post a Comment