Monday, April 2, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी




फोटो:- “भारतीय संस्कृती आणि श्री-शिवचरित्र” या विषयावर विवेचन करताना प्रमुख व्याख्याते व इतिहास अभ्यासक श्री.अभय भंडारी (पुणे)
 


फोटो:- किल्ला स्पर्धेचे परीक्षण करताना इतिहास अभ्यासक श्री.अभय भंडारी,पुणे

  आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.पहाटे ४ वाजता महाविद्यालयातील विद्यार्थी कसबा,संगमेश्वर येथे शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले आणि सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयात पोहोचले.त्यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्याहस्ते छ.शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करण्यात आले.
  याप्रसंगी ‘इतिहास मंच’चे सल्लागार प्रा.विशाल पारकर,सर्व विभागप्रमुख,सहायक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ‘इतिहास मंच’चे सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी प्राचार्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. प्रा.विशाल पारकर सरांनी महाराजांचे विचार आजही किती प्रेरणादायक आणि क्रांतिकारक आहेत हे पटवून दिले.तसेच ‘इतिहास मंच’चे अध्यक्ष कु.स्वप्नील तांबे याने महाराजांची प्रेरणा घेऊन आजच्या तरूण पिढीने स्वत:मध्ये बदल घडवून समाजाची आणि परिणामी देशाची प्रगती घडवून आणण्यासाठी तरुणांना आवाहन केले.
  शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात किल्ला स्पर्धा आणि वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन ‘इतिहास मंच’तर्फे करण्यात आले.या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील शाळा आणि महाविद्यालयातील स्पर्धकांना आमंत्रित केले होते. किल्ला स्पर्धेमध्ये लहान गटात न्यू इंग्लिश स्कुल देवरुखच्या स्पर्धकांनी प्रथम तर निवे आश्रम शाळेतील स्पर्धकांनी द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच मोठ्या गटात ए.एस.पी. महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी प्रथम तर आरएमसीइटी आंबवच्या स्पर्धकांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये लहान गटात सीमा जाधव(ए.एस.पी. विद्यालय,देवरुख)हिने प्रथम,चिन्मय तरळ(न्यू इंग्लिश स्कुल देवरुख)याने द्वितीय व वैष्णवी चाळके(न्यू इंग्लिश स्कुल देवरुख) हिने तृतीय क्रमांक पटकावला.तसेच मोठ्या गटात वैभव ओगळे(आरएमसीइटी) याने प्रथम,जालीन्धर कोकरे(फार्मसी कॉलेज,साडवली) याने द्वितीय आणि शिवम लिंगायत याने तृतीय क्रमांक पटकावला.किल्ला स्पर्धेचे परीक्षण श्री.अभय भंडारी(प्रमुख व्याख्याते,पुणे) यांनी तर वक्तृत्त्व स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयातील प्रा.राहुल राजोपाध्ये,श्री.विशाल पारकर आणि श्री. देठे यांनी केले.
  त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रमुख व्याख्याते इतिहास अभ्यासक श्री.अभय भंडारी(पुणे) यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.अभय भंडारी यांनी आपल्या व्याख्यानात “भारतीय संस्कृती आणि श्री-शिवचरित्र” या विषयावर विवेचन केले.त्याप्रसंगी बोलताना त्यांनी गड किल्ले संरक्षण,प्रासंगिक युद्ध नीती या शिवरायांच्या गुणविशेषांची प्रचिती व्यक्त केली तसेच शिवकालीन भारतीय संस्कृती आणि सध्याची भारतीय संस्कृती यांच्यातील विरोधाभास विशद केला.
  व्याख्यानानंतर विजेत्या स्पर्धकांना श्री.अभय भंडारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘इतिहास मंच’चे अध्यक्ष कु.स्वप्नील तांबे याने केले. ‘इतिहास मंच’चे कार्यक्रम व्यवस्थापक कु.ओंकार कुलकर्णी याने आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘इतिहास मंच’च्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment