Monday, April 2, 2018

मातृभाषा हा आपल्या अस्तित्वाचा हुंकार - प्रा. राजोपाध्ये



Photo:- मराठी भाषा दिन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , प्रमुख पाहुणे म्हणून “अंतर्साद” कवितासंग्रहाचे कवी प्रा. राहुल राजोपाध्ये तसेंच कार्यक्रम आयोजक प्रा.जितेंद्र खैरनार व उपस्थित प्राध्यापक
  मराठीभाषा दिनाचे औचीत्य साधून प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद माने आभियांत्रिकी महाविद्यालयातील “ ग्रंथालय विभाग व मराठी भाषा साहित्य मंडळ”  यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , प्रमुख पाहुणे म्हणून “अंतर्साद”  कवितासंग्रहाचे कवी प्रा. राहुल राजोपाध्ये तसेंच कार्यक्रम आयोजक प्रा.जितेंद्र खैरनार (ग्रंथालय प्रमुख) उपस्थित होते .
  मातृभाषेचा उगम आणि त्याचा समाजमनावरील परिणाम याबाबत प्रा. राजोपाध्ये यांनी विस्तृत विवेचन केले . मातृभाषा आणि आपले नाते यांचे स्वरूप स्पष्ट करतांना त्यांनी चक्रधर स्वामींचे लीलाचरीत्र , ज्ञानेश्वरी तसेच तुकारामांची गाथा यातील संदर्भ देत त्यांनी मराठी भाषेला मोठा वारसा मिळालेला आहे तो टिकवण्याचे आवाहन केले .
  प्राचार्य डॉ. भागवत यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी मराठीचे वाचन केले पाहिजे तसेच मराठी भाषेचे योगदान समजावून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी प्रा.पारकर व प्रा.वाईकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी “अंतर्साद” व प्रा.जितेंद्र खैरनार  यांनी “हुंडा” या त्यांच्या कवितांचे वाचन केले. सदर कार्यक्रमप्रसंगी ग्रंथालयातर्फे मराठी पुस्तकांचे एक दिवशीय ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
  सदर कार्यक्रमानंतर चहापानाप्रसंगी कविकट्टामध्ये कुणाल भिडे यांनी सूर नवा सापडे या कवितेचे गायन केले व मराठी गीत सादर केले . सूत्रसंचालन कु . श्रेया पालकर व आभारप्रदर्शन प्रा. सीमा भूरवणे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय समिती व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment