Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकीच्या श्रेयस डोंगरेच्या प्रतिकृतीचा ‘इंडिया बुक रेकॉर्ड २०१८’ मध्ये समावेश!!फोटो:- श्रेयस डोंगरेच्या प्रतिकृतीचाइंडिया बुक रेकॉर्ड २०१८ मध्ये समावेश झाल्याबद्दल सन्मान करताना  संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्राचार्य डॉ.महेश भागवत व उपस्थित प्राध्यापक

   राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील श्रेयस डोंगरे यांने टाकाऊ वस्तूंपासून महाविद्यालयाची मोठी प्रतिकृती तयार केली असून याची दाखल घेत इंडिया बुक रेकॉर्ड २०१८ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
    आपल्या टीमसोबत साकारलेल्या राजेंद्र माने इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रतिकृतीची लांबी ४७ इंच,रुंदी २६ इंच व उंची १४ आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या प्रतिकृतीसाठी १०१६ पॉप स्टिक्स,नारळाच्या काथ्या,करवतीची धूळ,टाकाऊ गम,बाटलीचे झाकण व इतरही अनेक वस्तू वापरल्या आहेत.अवघ्या ५ दिवसात त्याने ही प्रतिकृती तयार केली. ”बेस्ट आउट ऑफ वेस्ट” या प्रकारामध्ये त्याची प्रतिकृती सर्वोत्तम म्हणून समाविष्ट केली आसून त्यानिमित्त त्याचा सत्कार करण्यात आला.
    त्याच्या या यशाबद्दल त्याचा सत्कार संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने यांच्या हस्ते “सिंटीला २K१८” या तांत्रिक परिषदेच्या निरोपसमारंभावेळी करण्यात आला.त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.महेश भागवत,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
 

No comments:

Post a Comment