Monday, September 18, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन - ग्लोबल परस्पेक्टीव्ह ” या विषयावर व्याख्यान आयोजित ‼



अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन- ग्लोबल परस्पेक्टीव्ह या विषयावर मार्गदर्शन करतानाडॉ. महेश बुर्शे

  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिसर्च अॅंड डेव्हलपमेंटविभागातर्फे अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन- ग्लोबल  परस्पेक्टीव्ह”  विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याव्याख्यानाला डॉमहेश बुर्शे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. लक्ष्मण नाईक यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

  मार्गदर्शक डॉमहेश बुर्शे हे सध्या ‘लॉरेल रिसर्च अॅंड इनोव्हेशन एजीएम - स्किनकेअर मेटिअर’ मध्ये हेड म्हणून कार्यरत आहेत.ते मुळचे देवरुखचे असून महेश एजन्सीज, देवरुखच्या मनोज बुर्शेंचे भाऊ आहेत.त्यांनी युडीसीटी मधून एम.एस.सी. व पी.एच.डी.केले आहे व याआधी त्यांनी ‘कोलगेट’ मध्ये रिसर्चर म्हणून काम केले आहे. त्यांचा अॅकॅडेमिक व इंडस्ट्री मध्ये २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा विविध भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदा झाला आहे. त्यांनी ‘पर्सनल केअर प्रोडकट्समध्ये’ व त्यांच्या तांत्रिक पूर्ततेची खात्री करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.औद्योगिक क्षेत्राला पूरक ठरलेल्या त्यांच्या संशोधनामुळे त्यांच्या नावावर काही पेटंटसही आहेत.सद्यस्थितीतील जागतिक स्तरावरील अद्ययावत संशोधन व नवनिर्मिती याविषयी त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाअंती आभारप्रदर्शन रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट विभागाचे प्रा.लक्ष्मण नाईक यांनी केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस.एन.वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment