Sunday, July 30, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “कारगिल विजय दिवस” साजरा !!

  

फोटो:- ‘कारगिल युद्धाची याशोगाथा’ या विषयावरती व्याख्यान देताना सामाजिक व्याख्याते श्री.श्रीनिवास पेंडसे व उपस्थित विद्यार्थी

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील एन.एस.एस. तर्फे २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतासाठी एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारगिल युद्ध जवळजवळ ६० दिवस चालले आणि २६ जुलैला त्यामध्ये भारताचा विजय होऊन युध्द समाप्तीची घोषणा झाली. कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना सन्मान देण्याच्या हेतूने दरवर्षी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  यावर्षी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व्याख्याते श्री.श्रीनिवास पेंडसे यांचे कारगिल युद्धाची याशोगाथा या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत,श्री.संतोष तोंशल हे उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. राहुल बेळेकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून व्याख्यात्यांची ओळख करून दिली. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
  याप्रसंगी बोलताना श्री. पेंडसे यांनी हा चुका सुधारण्याचा दिवस असल्याचे सूचित केले. कारगिलच्या युद्धामागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना श्री. पेंडसे यांनी विविध उदाहरणांच्या सहायाने त्यावेळची परिस्थिती नेमकी विषद केली.सामान्य नागरिकांचा आपल्या देशाप्रती असलेला आदरभाव,सैन्याप्रतीची त्यांची निष्ठा यांचा उल्लेख करून त्यांनी अब्दुल गुराखी,कॅ.अमित शर्मा, कॅ.सौरभ कालिया यांच्या योगदानाबद्दल विस्तृत माहिती दिली.
  सियाचीन,कारगिल,द्रास याठिकाणी असलेल्या प्रतिकूल वातावरणाची त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.भारत हा सर्जनशील व्यक्तींचा देश असून वैश्विक महासत्ता होण्याच्या दृष्टीने त्याचा प्रवास सुरु असून यामध्ये सुशिक्षित तरुणांनी स्वत:चे योगदान देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
  याप्रसंगी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एन.एस.एस. चे प्रा.विस्मयी परुळेकर,प्रा.अमोल कुंभार यांचे सहकार्य लाभले.




No comments:

Post a Comment