Monday, July 10, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला चिपळूणच्या ज्येष्ठ नागरिक संघाची सदिच्छा भेट‼



  आंबव, देवरुख स्थित प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला चिपळूणच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या १० सदस्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.या भेटीमध्ये त्यांनी महाविद्यालयाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,प्रा.वैभव डोंगरे व प्रा. अनिकेत जोशी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत व आदरातिथ्य केले.
  महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्राचार्य डॉ. भागवत यांनी महाविद्यालयाविषयी माहिती देऊन प्रगतीचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. महाविद्यालयात चालणारे विविध उपक्रम व त्याद्वारे विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास यासाठी आपले महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते असे ते म्हणाले. प्रा.वैभव डोंगरे यांनी महाविद्यालयाचे प्रेझेंटेशन ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर केले.
  त्यानंतर उत्सुकतेने सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महाविद्यालयाचे विविध विभाग,लॅब्स,टीम एम.एच. ०८ ची कार्यशाळा आदी ठिकाणी फेरफटका मारला व विशेषकरून टीम एम.एच. ०८ च्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पस विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले व उत्तरोत्तर महाविद्यालयाची प्रगती होवो अशा शुभकामना त्यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिक संघाने स्वेच्छेने महाविद्यालयाला भेट देण्याची हि पहिलीच वेळ आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.वैभव डोंगरे व प्रा. अनिकेत जोशी यांनी विशेष सहकार्य केले.
 

No comments:

Post a Comment