Wednesday, April 12, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकीमध्ये संगणक विभागातर्फे कोअर व ऍडव्हान्स जावा या विषयावर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न




फोटो:- कोअर  व ऍडव्हान्स जावा विषयावरील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शक व पुणे येतील तज्ज्ञ प्रशिक्षक श्री संजय देगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , विभागप्रमुख प्रा.मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी तसेच उपस्थित विद्यार्थी

देवरुख –
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये १३ दिवसांची  “कोअर  व ऍडव्हान्स जावा  या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. उदघाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर पुणे येतील तज्ज्ञ प्रशिक्षक श्री संजय देगावकर  यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , विभागप्रमुख प्रा.मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी उपस्थित होते.सदर कार्यशाळेमध्ये कोअर जावाया विषयावर मार्गदर्शन महाविद्यालयातील संगणक  विभागातील  प्रा. मंगेश गोसावी यांनी केले असून ऍडव्हान्स जावा”  या विषयासाठी श्री संजय देगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. मुश्ताक गडकरी यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विशद केली .याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे हि काळाची गरज आहे असे सांगत सदर कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले तसेच विदयार्थांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल संगणक विभागप्रमुख प्रा .मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी यांचे अभिनंदन केले.
  या कार्यशाळेमध्ये जावा हि प्रोग्रामिंग लँग्वेज विस्तृतपणे शिकवण्यात आली.तसेच जावा सेर्व्हलेट ,जेसपी,स्प्रिंग,एक्समैल,टीडीडी यांमधून कॉम्पुटर प्रोग्रॅम कसे केले जातात यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ द्वितीय व तृतीय वर्षाच्या ३६ विष्यार्थानी घेतला.विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

  सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. मंगेश गोसावी,प्रा.मुश्ताक गडकरी,प्रा. विकास मोरे यांचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन श्रेयस सप्रे व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे समन्वयक प्रा. मंगेश गोसावी यांनी केले .

No comments:

Post a Comment