Wednesday, April 12, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंजिन व गिअरबॉक्स दुरुस्ती” या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन ‼

  

  प्रात्यक्षिक कौशल्याचा विकास ही विद्यार्थ्यांच्या यशस्वी ज्ञान संपादनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी जीवनात वाटचाल करत असताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच प्रात्यक्षिक कौशल्यालाही महत्त्व प्राप्त व्हावयास हवे असे मत आंबव देवरुख स्थित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंजिन व गिअरबॉक्स दुरुस्ती या एकदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
  याप्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी,तज्ञ मार्गदर्शक मार्लेश्वर ऑटो सर्विसचे श्री.संतोष गोपाळ तसेच कार्यक्रम आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले समन्वयक डॉ.सचिन वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख प्रा. संजय भंडारी यांनी अशा कार्यशाळांची गरज अधोरेखित करताना विद्द्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा होतानाच आत्मविश्वास वाढण्यामध्येही उपयोग असल्याचे नमूद केले.
  कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सचिन वाघमारे यांनी विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि विद्द्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पाठीमागे न लागता शंका समाधान करून घेऊन स्वत:चे प्रात्यक्षिक ज्ञान वाढवावयास हवे. या एकदिवशीय कार्यशाळेमध्ये दिवसभर दुचाकी वाहनामधील इंजिन तसेच गिअरबॉक्स संपूर्णपणे खोलून परत जोडण्यात आला.दुपारच्या सत्रात ऑटोमोबाईल विभागातील प्रा.आर.डी.वाटेगावकर यांनी विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  या कार्यशाळेचा लाभ तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीच्या ६१ विद्द्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यशाळा अतिशय उपयुक्त असल्याचा अभिप्राय अभिजित मोहिते,राहुल साळुंखे,करिष्मा टोणे,अक्षय करंग यांनी दिला. विद्द्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन अशाच प्रकारची फ्युएल इंजेक्शन पंप वरती भविष्यात कार्यशाळा घेण्याचा मनोदय समन्वयक डॉ.सचिन वाघमारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment