Saturday, April 1, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये “बिग डेटा अँड हडूप” वर कार्यशाळा संपन्न!






फोटो:- कार्यशाळेतील तज्ञ प्रशिक्षक श्री. रविश रजपूत यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, समन्वयक प्रा.मनीष प्रभू व संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी

  देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये नुकतीच तीन दिवसांची बिग डेटा अँड हडूप वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर मुंबई येथील दलविक अँप्सचे तज्ञ प्रशिक्षक श्री. रविश रजपूत यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, समन्वयक प्रा.मनीष प्रभू,सह समन्वयक प्रा.मिथुन माने उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.मुश्ताक गडकरी यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी दलविक अँप्स  बरोबर महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

  या कार्यशाळेमध्ये बिग डेटा हि संकल्पना विस्तृतपणे मांडण्यात आली. हडुप, मॅप रीड्युस या द्वारे प्रोग्रॅम कसे केले जातात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच पिग, हाइव्ह यासारखे डेटाबेसेस कसे काम करतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले.या कार्याशाळेचा लाभ चतुर्थ वर्षाच्या ४१ विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

  हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  प्रा.मनिष प्रभू,प्रा. मिथुन माने,प्रा. मुश्ताक गडकरी,प्रा. सुरेश कोळेकर यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.मनीष प्रभू यांनी केले.

No comments:

Post a Comment