Wednesday, March 23, 2016

माने महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत एक आठवडयाचे शिबीर संपन्न‼










  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत एक आठवडयाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. 

  विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार,बौद्धिकसंस्कार या गुणांची ओळख करून देऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एन.एस.एस. विभागाची स्थापना केली आहे. या अंतर्गत कष्टाची जाणीव विद्यार्थीदशेत होण्यासाठी श्रमदान संकल्पना रुजवली आहे. या शिबिरांतर्गत सकाळच्या सत्रामध्ये श्रमदानातून विविध समाजोपयोगी कामे करण्यात आली. यामध्ये आंबव येथे बंधारे बांधण्यात आले. त्याचप्रमाणे कालीश्री मंदिर,नागझरी,सिद्धेश्वर मंदिर,मारुती मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागझरी परिसरात पाण्याच्या स्त्रोतांची विशेष स्वच्छता करण्यात आली. 
 

   याचबरोबर निवे येथील प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच खाऊ वाटप करण्यात आले.दुपारच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये अॅड.श्री.सोमण यांनी जमिनीविषयक आणि वाहनाविषयक कायदे तसेच प्रा.संजय भंडारी यांचे ‘भारत जोडो सायकल अभियान’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले.तसेच अॅड. उमा प्रभावळकर यांनी ‘ महिला सबलीकरणाचे कायदे ’ या विषयावर आणि प्रा.प्रवीण जोशी यांनी ‘ ग्राहक संरक्षण कायदा ’ या विषयावर मार्गदर्शन केले.

   एक आठवडयाचे शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.राहुल बेळेकर आणि सहसमन्वयक प्रा.गुरुप्रसाद बुर्शे यांनी उत्तमरित्या पार पाडले.याकरिता त्यांना प्रा.राहुल पोवार,प्रा.माणिक पवार तसेच समीर यादव,अक्षय दळवी,सत्यजित सपकाळ यांचे उत्तम सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment