Tuesday, January 19, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “एम्बेडेड टेक्नोलॉजी” वर कार्यशाळा संपन्न !!



विभागप्रमुख प्रा.अडूरे,समन्वयक प्रा.शिकलगार,प्रोलिफिक सिस्टिम्सचे तज्ञ,प्राचार्य डॉ. भागवतविद्यार्थी


देवरुख: आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे एम्बेडेड टेक्नोलॉजी ” या विषयांतर्गत नुकतीच आठ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
    या कार्याशाळेला श्री.राजेश रागासे व श्री.प्रशांत हिरवे (प्रोलिफिक सिस्टिम्स प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.हि कार्यशाळा एम्बेडेड टेक्नोलॉजी विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती.
  या कार्याशाळेमध्ये मायक्रोकन्ट्रोलर,पिआयसी व आर्म प्रोसेसर यांच्या ‘सी’ आणि ‘असेम्ब्ली’ भाषांमधून प्रोग्रॅमिंगद्वारे प्रात्यक्षिक करण्यावर भर देण्यात आला.किल आयडीइ,फ्लॅश मॅजिक व एमपिलॅब या सॉफ्टवेअर माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला.त्यामुळे या साधनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. मायक्रोकन्ट्रोलरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी डिसी मोटर,एल सी डी डिस्प्ले इ.उपकरणांवर नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक केले.
  कार्यशाळेचा उद्देश विभागप्रमुख प्रा.अडूरे सर यांनी विषद केला.यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले की नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले कौशल्य वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा. इसाक शिकलगार,विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


No comments:

Post a Comment